Sunday, 16 December 2018

नाती ..
आपण जेव्हा या जगात येतो तेव्हा बाळ म्हणून आपल्याकडं पाहिलं जात  ,थोड मोठं झाल्यावर पिल्लू ,सोनू ,चिकू , राजा ,राणी या नावाने बोलावतात ,आणखी थोड मोठं झालं की दीदी, दादा,ताई होतो ,नात्यांची वीण किती बदलत जाते ना ...वहिनी ,दादा,काका ,काकी ,मामा ,मामी यांची जागा आपण कधी घेतो कळताच नाही पण त्याबरोबरच टप्प्याटप्प्याने जबाबदाऱ्या पण वाठत जातात ..आणि आई ,बाबा या हाकेने तर जीवन बदलून च जात ,आपलं सगळं अस्तित्व या नात्याने पारखून निघत.पुढे आजी आजोबा नावांची ओढ वाट बघत असते ..आपले फक्त रोल बदलत असतात .माणूस तोच पण भूमिका बदलत जातात .अस खूप वेळा होत , आयुष्यात जेव्हा आपल्याला देणं असत, तेव्हा आपण न विचार करता सढळ हाताने  देतो ,पण जेव्हा आपल्याला घेणं असतं तेव्हा मात्र तेच दोन सढळ  हात , घेताना मात्र  थरथर त असतात ..( स्वाती प्रशांत गुरव )

Friday, 14 December 2018

मातीतल्या आठवणी ...
      ठेविले अनंते , तैसेचि रहावे ...याप्रमाणे जे काही देवाने दिलेले आहे त्यात समाधान मानून जगणारे लोकं.दुष्काळी भाग ,कोरडी माणगंगा नदी,नदीच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती असलेले छोटंसं गाव .ज्या गावाने माझ्या बालपणीच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत .आई च्या हाताला धरून याच मातीत चालायला शिकले .याच मातीत खेळले ,पडले आणि उभी राहिले ..

       याच गावाबद्दल थोडासा लिहिण्याचा प्रयत्न ..
वडिलांची बदली झाली आणि आम्ही गोंदवल याला आलो,,त्यापूर्वी कधी न पाहिलेले गाव .पण या गावाने इथल्या मायाळू माणसांनी आम्हा कुटुंबीयांना कधी आपलंसं केल कळलच नाही  आणि जवळ जवळ १३ वर्ष इथे राहायला  मिळालं..गावातल्या मध्यभागी मारुती च मंदिर आहे , त्याच्या जवळच एका वाड्यात आम्हाला राहायला जागा मिळाली .तेव्हा कुठे मी नुसती चालायला शिकलेले ...आजही हे लिहिताना तो वाडा त्या खोल्या डोळ्यासमोर येतायत. मंदिराजवळच छोटीशी बालवाडी होती तिथे मी जाऊ लागले .खूप आठवण येते अनिता बाई ,देशपांडे बाई ,आणि डब्यातून मिळणाऱ्या सुकडीची .पुन्हा १ ली ते ४ थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळे तला प्रवेश .तेव्हा अपुऱ्या जागेमुळे आणि शाळा दूर असल्याने आम्ही राहण्याचे ठिकाण बदलले ..आणि पुन्हा माझी जिवाभावाची मैत्रीण मेघा  भेटली ..मग आमचं दोघींचं शाळेला रोज बरोबर जाणं .बरोबर अभ्यास कारण चालू झालं ..कायम सोबत असायचो आम्ही .पुन्हा ते दिवस जगायला मिळावे असच वाटतं  अगदी .पहिली ते चौथी चारही ईयत्तेत आम्हाला एकच बाई होत्या रेमने बाई ..अतिशय कडक ..पण आज जे आम्ही आहोत ते आमच्या बाई न मुळे च .. खूप भीती वाटायची शाळेला जायची ..पण सगळं वेळच्या वेळी पूर्ण करण ..अभ्यासाचं नियोजन करणं ,स्वच्छ ता आरोग्य सगळं सगळं बाई न मुळे कळलं ..आणि आजही त्यांनी सांगितलेलं जसच च्या तास आठवतंय ..बाई आठवड्यातून एकदा हस्ताक्षर च्या स्पर्धा घायच्या ..त्यात पहिला नंबर मिळण्याची अमाची कायम धडपड  असायची ..शाळेत गेल्या गेल्या पहिला तास शाळेच्या आवारातील स्वच्छ तेचा असायचं नंतर प्रार्थना ..आणि वर्षातून  एकदा दवाखान्यातील लोक आमची आरोग्य तपासणी साठी यायचे तेव्हा माझी खरी परीक्षा असायची .तेव्हा मी शाळेत जायला तयार च नव्हते खूप घबरायचे ... पप्पा नी घरापासून अगदी शाळेपर्यंत मारत मारत नेलेले ..बार्शी करांच हॉटेल होत चौकात तिथे खूप लोक असायचे ..पप्पा नी मारत मारत नेल्यामुळे परत मला तिथून जायला खूप कसातरी  वाटायचं ..आणि बाई न मुळे शाळेची कधी अवड निर्माण झाली कळलच नाही .शाळेजवळ च दवाखाना होता ,पप्पा दवाखान्यात X.ray techinichian असल्याने त्यांना गावात सर्व ओळखायचे . आणि त्यामुळे मी पप्पा ना खूप घाबरायचे .काही दिवसांनी दवाखान्यात क्वार्टर मधे राहायची सोय झाली आमची .. ५ ते १० वी शाळा बदलली ..तिथे नव्या मैत्रिणी मिळाल्या आणि नवे शिक्षक .शाळेची प्रार्थना ,P E चा तास ,विविध गुण दर्शन कार्यक्रम त्यात आमचा रमेश काका नी बसवलेला ...डान्स ..मेरे देश की धरती ...त्याचा रोज एक तास सराव असायचा . प्रियांका ,रुपाली पार्वती ,नयना यांच्या बरोबर केलेला अभ्यास ,खेळ ,स्पर्धा न मधला सहभाग ..सगळं आजही तसच आठवतंय ...शाळेचं स्टेज आणि तिथे मी १० वीच्या निरोप समारंभात केलेलं भाषण ,,शाळेचं परिपाठ म्हणयला जाताना थरथरणारे पाय ,हो आणखी एक आठवण म्हणजे करा टे क्लास ..पहिल्याच बेल्ट च्या साठी आम्ही सगळे द हिवडी ल गेलेलो ...आणि माझा तो दिवस माझ्या karate class cha शेवटचा दिवस ..कारण येताना चशम्याच्या फुटलेल्या काचा हातात घेवून रडत रडत घरी आलेले .९ मधे असताना कन्याकुमारी उटी म्हैसूर ची आमची ट्रीप .त्यासाठी पापा thank you .ata ठरवून पण अशी ट्रीप परत काढणं जमलच अस नाही . आणखी एक आठवण म्हणजे आमचे योगा चे क्लासेस ..पहाटे दवाखाना ते देवळापर्यंत पळत योगा च्या क्लास ल खांडेकर सरांकडे यायचो ..त्या वेळी त्या काळी योगासन ,आणि इंग्रजी या दोन्ही टोकाच्या गोष्टींमध्ये पारंगत असलेली व्यक्ती म्हणजे खांडेकर सर .. सर तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद .
     गावाच्या नदीला कधीतरी येणारा पुर आणि पूर बघण्यासाठी जमणारी गर्दी ...तेव्हाच  काय तो गाव नदीच्या दोन्ही काठाला उभ राहायचा .गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भरणारी यात्रा ..आणि उंच दही हंडी .हे गावच वैशिष्टय .गावात होणाऱ्या नाट्यस्पर्धा ..त्याच श्रेय रमेश काका नाच ..मला घेतलेली नवीन सायकल आणि त्यावरून मी प्रियंका आणि उज्वला अगदी पळशी  पर्यंत गेलेलो .पार्वती रानातला खाऊ अगदी मायेने प्रेमाने आणायची आणि आम्ही ही आवडीने खायचो ..
   खरंच परत भेटेल का हे सगळं अनुभवायला ..परत मिळेल का शाळेतला तो बेंच , बळवडीतली डब्या तली सुकडी ...गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये या माझ्या मातीत जाण्याचा योग आला .. तेव्हा मी पाहिलेला गाव आणि माझ्या आठवणीतलं गाव यात खूप फरक होता ..शाळेची जीर्ण झालेली इमारत पण त्यावर लिहिलेलं राष्ट्रगीत अजूनही तसाच होत..दवाखान्याचा मैदान आणि ते मोठं झाड ज्याखली आम्ही दिवसभर खेळायचो ..सगळं मोडकलय पण तो उंच डेरेदार वृक्ष दवाखणाच्या आव रात आजही तसाच तटस्थ पने उभा आहे ...जुन्या आठवणी कवेत  घेवून...
 (गावाचे नाव .. गोंदवले तालुका माण जिल्हा सातारा ) स्वाती प्रशांत गुरव 

Tuesday, 4 December 2018

अपेक्षांचं ओझ ...

    अपेक्षा हा शब्द एकटा असला तरी त्याच्यामध्ये खूप ताकद आहे .आणि मग त्याच्या मागे ओझ  हा शब्द लागला की मग झालाच ..अपेक्षांचं ओझं ...म्हणजेच थोडंसं निगेटिव्ह ,न पेलणार असं.
      अपेक्षा कुणी ,कधी ,कुणावर ,कुणाकडून, करायच्या याला बंधन नाही .लाहांनानी मोठ्यनाकडून खेळण्यांची  अपेक्षा .आणि मोठ्यांनी लहनंकडून अभ्यासाची ...काहीतरी चांगलं करण्याची  अपेक्षा,फक्त अपेक्षा आणि अपेक्षा .जग सगळं या अपेक्षांच्या ओझ्यावर दबून गेलंय .
        विद्यार्थी दशेतील काळ खर तर अतिशय छान मनासारखं जगण्याचा ..हवे ते निवडून त्याचा अभ्यास करण्याचा पण हा अपेक्षा शब्द मधे येतो ...आणि या विद्यार्थी दशेला वेगळं वळण मिळत .... मला माझ्या आई ने  सांगितलेआहे ...की  डॉक्टर हो ..किंवा वडिलांनी सांगितलं आहे इंजिनिअर हो .आणि त्यानुसार काही मुले अभ्यासाला लागतात ...पण मनात स्वतच्या आवडत्या विषयाची वेगळीच ओढ असते.गाण्याची आवड, नृत्याची आवड , चित्रकलेची आवड किवां भाषा विषय घेवून पुढे काहीतरी करायची इच्छा असेल तर ती बाजूला ठेवून मुले आई वडील जे सांगतात त्या दिशेला वळतात .पण त्यामुळे मागे राहतात ..आणि मनात नसताना , आवड नसताना केवळ दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात आपण कोणतच करिअर नीट सांभाळू शकत नाही .
हे मुलांना खूप उशिरा कळून चुकत पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते ,जे आहे ते स्वीकारून आयुष्यभर जगावं लागत .
         आयुष्य म्हणजे म्हतलं तर तारेवरची कसरत आणि म्हतल तर मनमुराद जगण्याची संधी ..गरिबाला पोटाला मिळण्याची चिंता ,मध्यमवर्गीयांना मोठी स्वप्न पाहण्याची भीती ,आणि श्रीमंतांना घरातून बाहेर पडण्याची चिंता .. म्हणजे खर पाहिलं तर सुखी कुणाला म्हणावं .जो जे मिळाले आहे त्यात सुख मनेल तोच सुखी .मग आताच्या करीयर ची स्वप्न पाहणाऱ्या .. करिअर ल दिशा देवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी उघड्या डोळ्यांनी जगाची स्थिती पाहा , आजूबाजूची  बदलती  परिस्थिती पहा आणि मग निर्णय घ्या डॉक्टर व्हायचं , इंजिनिअर व्यायच ,व्यावसायिक व्हायचं ..का जे आवडेल त्यात पुढे जाऊन त्यात जे मिळेल त्यात समधान मानून एक स्वस्थ ,निरोगी ,प्रामाणिक आयुष्य जगायचं .आहे त्या परिस्थितीत सकारात्मक विचार करून जीवनात यश मिळवा .जीवन जगत असताना ,यश मिळवत असताना ,अपयश दुखः अडचणी या जीवनात येणारच पण त्यावर  विचार करून ,चिंतन करून मार्ग काढणे गरजेचे आहे .
  ( स्वाती प्रशांत गुरव ) 

Sunday, 2 December 2018

नशिब

प्रत्येकाला देव सगळंच देतो असं नाही ,,कुणाला एखादी गोष्ट जास्त तर अखादी कमी..ज्याला जास्त मिळालंय त्याने कधी गर्व करू नये आणि कमी मिळालंय त्याने कधी कमीपणाचे दुःख करू नये ,,मी धन धान्य पैसा अडका याबद्दल मुळीच बोलत नाही ,,तर आपल्याला देवाने दिलेली खरी देणगी आहे ती म्हणजे आपले शरीर .........ज्याला सगळं व्यवस्थित मिळालं.त्याला त्या शरीराचे महत्व कधी जानवतच नाही .उलट ज्याला   एका पायाने आणि अका हातात कुबडी घेवून चालावे लागते ..एखाद संकट आलं की लोक सुरक्षित ठिकाणी पळतात ,दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पळत असतात आणि अशात पाय नसणारा आहे त्याला  पायाचे महत्व विचारा,,ज्याला देवाने दोनी हाथ दिले ..तो हाताने सगळी कामे करतो पण ज्याच्याकडे नाही ,त्याला विचारा ,जेव्हा समोर पंचपक्वन आहेत आणि त्याला ,हात नाही म्हणून जेवता येत नाही, यासारखं दुःख ते काय ,,,,,,,राहिला डोळा ,,लोकांना चष्मे लागतात वयानुसार ,,टीव्ही बघून ,,कीवा मोबाईल सारखं बघून अस म्हंतल जात ..पण काहींना त्यांचा काही दोष नसताना ..देव दृष्टी कमी करतो ..जेव्हा प्रत्येक गोष्ट बघताना हाताने चाच पडावे लागते ..प्रत्येक गोष्ट अगदी एकदम जवळ जाऊन बघावी लागते ,,बुडत्याला काठीचा आधार तसा दृष्टी कमी असणाऱ्यांना चष्म्याचा आधार ..तसा तो आधारच जर सापडला नाही तर काय होईल..समोर पूर्ण  अंधार  आणि फक्त अंधार .....डोळा हा शरिराचा खूप खूप खूप महत्वाचं अवयव आहे ..त्याला जपा ...या डोळ्यांच महत्व अंधारात चाचपडत  डोळ्यांना मदत करणाऱ्या त्या हाताना विचारा .........ज्याला या परिपूर्ण शरीराची संपत्ती मिळाली तोच खरं श्रीमंत ...अशा सर्व श्रीमंतांनी आपली संपत्ती जपा  ...           स्वाती प्रशांत गुरव

Tuesday, 27 November 2018

मावळतीचा सुर्य


   या धकाधकीच्या जीवनात मावळतीचा सुर्य पहिला की , दिवसभराचा थकवा निघून जातो .आपल्या जिवंत पणाची जणू तो साक्षच देत असतो ..आताची जीवनपद्धती पाहता सकाळी घरातुन बाहेर पडलेला माणूस सुखरूप घरी पोहो चेल ना याची धास्ती लागलेली असते .पण हा मावळतीचा सुर्य जगणं सोपं करून  जातो ...

  

Sunday, 18 November 2018

काळ आलाय ...पण ..?

       काळ बदलला पण परिस्थितीत पुन्हा तीच यायला लागलीय .पूर्वी जेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हा सगळे एक होवून लढत होते .शिवाजी महाराजांच्या काळात पण सर्वांनी एकीने लढा दिला आणि किल्ले काबीज केले .आजूनही जेव्हा पाकिस्तान आपल्यावर अरेरावी करतो, तेव्हा आपण  सगळे एक होतो .
              खरंच कौतुक आहे ना माझ्या देशाचं दुःखात एक होतात .आजही जेव्हा केरळ वर नैसर्गिक संकट आल ,तेव्हा सगळी राज्य ..म्हणजेच सगळे भारतीय एकत्र येवुन मदत करत होते. खरंच अभिमान वाटतो मला की , मी या देशाची नागरिक आहे ...पण..
             जेव्हा सगळ्यांचं सगळं चांगलं चाललेलं  असलं ..बर म्हणुया हवं तर ..सगळ्यांचं सगळं बर चाललं असलं की अचानक एखादी ठिणगी पडते ...आणि आत्महत्या ,उपोषण ,खून ,मारामाऱ्या ,बलात्कार अश्या बातम्या डोकं वर काढतात ..आणि आपला देश ..माझा देश पुरा हतबल होवून जातो ,,तोच माझा देश ज्या ने हजारो जाती धर्माचे ,हजारो भाषांचे ,हजारो परंपरांचे ,वेगवेगळ्या वर्णाचे लोक एकत्र बांधलेत .....
       हे अस का होवू लागलंय .अश्या बातम्या का येतायत ..जेव्हा देशाबाहेर  देशाच्या सीमेवर शांतता असते ...तेव्हा आपल्याकडे अनेक कारणं सापडतात पेटून उठायला ...जरा आत्मपरीक्षण करूया ..आणि खरंच आपल्या देशाला जे वेगळेपण मिळालं आहे ते जपुया .खरंच आपण पुण्यवान आहोत ..आपण या मातीत जन्म घेतला ..तिन्ही बाजूंनी सागराची साथ आणि डोक्यावर खंभिर पणे उभा असलेला हिमालय ...ही आपली शक्ती स्थान आहेत ...बाकी सगळं विसरून एक होवू या आणि या निसर्गाला वाचवूया ..निसर्ग अचानक काय करू शकतो हे तामिळनाडू मधील गज वादळ ,त्सुनामी ने दाखवून दिलंय ..तेव्हा मात्र आपण एकाच छताखाली मिळालेल्या आश्रयात राहतो ,एकाच ताटात  जे मिळेल ते खातो तेव्हा  कुठे जाते आपली जात आणि आपला धर्म ..तेव्हा असते  ती  फक्त माणुसकी ची जात आणि आपुलकीचा धर्म .. हिच वेळ आहे आपल्या सगळ्यांना एक होण्याची , नाहीतर एक  दिवस निसर्ग आपल्याला एकत्र आणेल ....
  (स्वाती प्रशांत गुरव )

Monday, 12 November 2018

सुखाची व्याख्या

सुख म्हणजे नक्की काय असतं  ..
सगळ्यांचं सगळच खूप छान चाललंय.कपडे खरेदी झाले , नवीन कपडे घालून पण झाले ,फटाक्यांची खरेदी झाली , अतिषबाजी पण झाली ,आकाशकंदील लावून घर सजवून पण झालं ,छान आखीव रेखीव रांगोळ्या आणि त्याचे छान फोटो पण काढून झाले ... आता पुढे काय ?
      परत आता नेहमीच रूटीन चालू होणार सगळ्यांची पैसा कमविण्यासाठी धावपळ .पण ..हा पण एक बरच काही सांगून जातो ........परवा काही कारणाने प्रवास झाला . प्रवास ऐन दिवाळीत झाला ..त्यामुळे जाण्याच्या आणि येण्याच्या मार्गावरची दिवाळी पाहता आली .छान सजलेली घर .आखीव रेखीव रांगोळ्या ,सुंदर तोरणं ..अगदी डोळ्यात साठवाव अस सगळं . पण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नजर वळली ..आणि मन एकदम निराश झालं ..गावाच्या बाहेर मोकळ्या मैदानात छोट्या छोट्या झोपड्या दिसल्या .बाहेर चुलीवर स्वयंपाक करत असलेल्या बायका ..झोळीत मुल .आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघणारी त्यांची मुलं ...थंडीत कुडकुडत असणारी पण मनाने खंबीर झालेली हि माणसे ...यांना नसेल का दिवाळी करावीशी वाटत ..नवीन कपडे घालून फिरावस नसेल का वाटत ..मनात विचारांनी  थैमान घातलं .पाहताना अंगावर काटा येतो . तर जगताना कसं वाटत असेल ..तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं .पण आपण खुश आहोत..आपण फक्त मनासारखं झालं कीच खुश असतो पुढे थोडी अवघड वाट लागली की परत आहे त्याच ठिकाणी येतो ..लगेच नाराज होतो ..पण जर आपल्या आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर सुख म्हणजे नक्की काय असतं ते कळतं ..जे मिळवायचं नसतं , फक्त अनुभवायचं नसतं तर ते मानायच  असतं ....आपल्या विचारात आपलं सुख असतं ..आपल्या वागण्यात सुख असतं ..आपल्या बोलण्यात सुख दडलेले असतं ..नकळतपणे आपल्यातच सुख दडलेले असतं ,जे शोधायचं नसतं , समोरच्याला द्यायचं असतं ..मग आपोआप आपल्याला अनुभवता येत .हेच जीवन आहे..
(स्वाती प्रशांत गुरव )

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...