Tuesday 27 November 2018

मावळतीचा सुर्य


   या धकाधकीच्या जीवनात मावळतीचा सुर्य पहिला की , दिवसभराचा थकवा निघून जातो .आपल्या जिवंत पणाची जणू तो साक्षच देत असतो ..आताची जीवनपद्धती पाहता सकाळी घरातुन बाहेर पडलेला माणूस सुखरूप घरी पोहो चेल ना याची धास्ती लागलेली असते .पण हा मावळतीचा सुर्य जगणं सोपं करून  जातो ...

  

Sunday 18 November 2018

काळ आलाय ...पण ..?

       काळ बदलला पण परिस्थितीत पुन्हा तीच यायला लागलीय .पूर्वी जेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हा सगळे एक होवून लढत होते .शिवाजी महाराजांच्या काळात पण सर्वांनी एकीने लढा दिला आणि किल्ले काबीज केले .आजूनही जेव्हा पाकिस्तान आपल्यावर अरेरावी करतो, तेव्हा आपण  सगळे एक होतो .
              खरंच कौतुक आहे ना माझ्या देशाचं दुःखात एक होतात .आजही जेव्हा केरळ वर नैसर्गिक संकट आल ,तेव्हा सगळी राज्य ..म्हणजेच सगळे भारतीय एकत्र येवुन मदत करत होते. खरंच अभिमान वाटतो मला की , मी या देशाची नागरिक आहे ...पण..
             जेव्हा सगळ्यांचं सगळं चांगलं चाललेलं  असलं ..बर म्हणुया हवं तर ..सगळ्यांचं सगळं बर चाललं असलं की अचानक एखादी ठिणगी पडते ...आणि आत्महत्या ,उपोषण ,खून ,मारामाऱ्या ,बलात्कार अश्या बातम्या डोकं वर काढतात ..आणि आपला देश ..माझा देश पुरा हतबल होवून जातो ,,तोच माझा देश ज्या ने हजारो जाती धर्माचे ,हजारो भाषांचे ,हजारो परंपरांचे ,वेगवेगळ्या वर्णाचे लोक एकत्र बांधलेत .....
       हे अस का होवू लागलंय .अश्या बातम्या का येतायत ..जेव्हा देशाबाहेर  देशाच्या सीमेवर शांतता असते ...तेव्हा आपल्याकडे अनेक कारणं सापडतात पेटून उठायला ...जरा आत्मपरीक्षण करूया ..आणि खरंच आपल्या देशाला जे वेगळेपण मिळालं आहे ते जपुया .खरंच आपण पुण्यवान आहोत ..आपण या मातीत जन्म घेतला ..तिन्ही बाजूंनी सागराची साथ आणि डोक्यावर खंभिर पणे उभा असलेला हिमालय ...ही आपली शक्ती स्थान आहेत ...बाकी सगळं विसरून एक होवू या आणि या निसर्गाला वाचवूया ..निसर्ग अचानक काय करू शकतो हे तामिळनाडू मधील गज वादळ ,त्सुनामी ने दाखवून दिलंय ..तेव्हा मात्र आपण एकाच छताखाली मिळालेल्या आश्रयात राहतो ,एकाच ताटात  जे मिळेल ते खातो तेव्हा  कुठे जाते आपली जात आणि आपला धर्म ..तेव्हा असते  ती  फक्त माणुसकी ची जात आणि आपुलकीचा धर्म .. हिच वेळ आहे आपल्या सगळ्यांना एक होण्याची , नाहीतर एक  दिवस निसर्ग आपल्याला एकत्र आणेल ....
  (स्वाती प्रशांत गुरव )

Monday 12 November 2018

सुखाची व्याख्या

सुख म्हणजे नक्की काय असतं  ..
सगळ्यांचं सगळच खूप छान चाललंय.कपडे खरेदी झाले , नवीन कपडे घालून पण झाले ,फटाक्यांची खरेदी झाली , अतिषबाजी पण झाली ,आकाशकंदील लावून घर सजवून पण झालं ,छान आखीव रेखीव रांगोळ्या आणि त्याचे छान फोटो पण काढून झाले ... आता पुढे काय ?
      परत आता नेहमीच रूटीन चालू होणार सगळ्यांची पैसा कमविण्यासाठी धावपळ .पण ..हा पण एक बरच काही सांगून जातो ........परवा काही कारणाने प्रवास झाला . प्रवास ऐन दिवाळीत झाला ..त्यामुळे जाण्याच्या आणि येण्याच्या मार्गावरची दिवाळी पाहता आली .छान सजलेली घर .आखीव रेखीव रांगोळ्या ,सुंदर तोरणं ..अगदी डोळ्यात साठवाव अस सगळं . पण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नजर वळली ..आणि मन एकदम निराश झालं ..गावाच्या बाहेर मोकळ्या मैदानात छोट्या छोट्या झोपड्या दिसल्या .बाहेर चुलीवर स्वयंपाक करत असलेल्या बायका ..झोळीत मुल .आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघणारी त्यांची मुलं ...थंडीत कुडकुडत असणारी पण मनाने खंबीर झालेली हि माणसे ...यांना नसेल का दिवाळी करावीशी वाटत ..नवीन कपडे घालून फिरावस नसेल का वाटत ..मनात विचारांनी  थैमान घातलं .पाहताना अंगावर काटा येतो . तर जगताना कसं वाटत असेल ..तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं .पण आपण खुश आहोत..आपण फक्त मनासारखं झालं कीच खुश असतो पुढे थोडी अवघड वाट लागली की परत आहे त्याच ठिकाणी येतो ..लगेच नाराज होतो ..पण जर आपल्या आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर सुख म्हणजे नक्की काय असतं ते कळतं ..जे मिळवायचं नसतं , फक्त अनुभवायचं नसतं तर ते मानायच  असतं ....आपल्या विचारात आपलं सुख असतं ..आपल्या वागण्यात सुख असतं ..आपल्या बोलण्यात सुख दडलेले असतं ..नकळतपणे आपल्यातच सुख दडलेले असतं ,जे शोधायचं नसतं , समोरच्याला द्यायचं असतं ..मग आपोआप आपल्याला अनुभवता येत .हेच जीवन आहे..
(स्वाती प्रशांत गुरव )

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...