Wednesday 19 December 2018

एक अशी कथा ,की जिला सत्यकथा म्हणावं का भास हा प्रश्नच आहे ..पण अंधश्रद्धा मात्र मुळीच नाही ....
     दिवेआगर ट्रीप झाली ,परतीचा प्रवास चालू झाला ,कोणत्या मार्गाने पुणे घाठायच या वर चर्चा चालू होती .एक जवळचा मार्ग पण थोडा अवघड आणि एक दूरचा पण सुरक्षित .शेवटी जवळचा मार्गाने जायचं ठरलं .प्रवास चालू झाला पोटात भुकेने कावळे ओरडत होते ,लहान मुल सोबत असल्याने लगेच जेवायला थांबलो.जवळ जवळ एक तास त्यातच गेला ,पुन्हा प्रवास चालू झाला .अंधार दाटून आलेला .तीन तासात पुण्यात पोहोचू असा अंदाज होता .गाडीच्या लाईट लागल्या आणि रात्र चालू झाली .डिसेंबर महिना त्यात थंडीचे दिवस त्यामुळे गाडी च्या काचा बंद केल्या .पुढे ,पाठीमागे गाड्यांची रांग पुढे पुढे सरकत होती .सगळ्यांना घरी पोहोचायचे वेध लागले होते .
 गाडीच्या लाईट च मंद प्रकाश ,रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गर्द झाडीवर पडत होता .खूप गरम झालं म्हणून थोडीशी खिडकीची काच खाली केली ,आणि थंड वाऱ्याची झुळूक काचेतून आत येताना रातकिड्यांचा किर किर आवाज घेवून च आत आली ..अंगावर सर्रकन काटा आला थंडी ने का भीतीने .कुणास ठाऊक ...मागे नजर टाकली , घाट असल्याने अगदी कमी स्पीड मधे गाड्या चालू होत्या .गाडीत एकदम शांतता होती मुलांची झोप लागलेली ,पण आम्ही मोठे लोक जागे असूनही आपापल्या विचारात मग्न होतो ,जणू काही प्रत्येकजण सारखाच विचार करत असावं पण वातावरण अस होत की मोठ्यानं बोलणं सुचलच नाही कुणाला .विचार करत करत घाटाचा बराच टप्पा ओलांडला असावा .आता घा ट संपेल आणि पुण्याच्या लाईट दिसतील .असा विचार मनात आला आणि दीर्घ श्वास घेतला जणू काही एवढा वेळ मी श्वास थांबवलेला .अचानक ब्रेक मुळे गाडी स्लो झाली ,,,आणि माझी विचार भ्रमंती थांबली आणि सगळेच एकदम बाहेर पाहू लागलो .सहजच प्रत्येकाच्या तोंडातून शब्द फुटले ..काय गाडी चालवतात लोक ,साईड देता येत नाही का ! खूप वेळच्या प्रयत्नानंतर आणि कुशल ड्रायव्हिंग चे कसब असल्याने गाडी रस्त्याच्या खालून अगदी छोट्या जागेतून पुढे  काढायच चालू होत कशीबशी जागा बघून गाडी पुढे जाऊ लागली आणि आम्ही रागाने त्या वाट न देणाऱ्या एकदम सावकाश निघालेल्या ट्रक कढे बंद काचेतून रागाने पाहू लागलो आणि धक्काच बसला ..डोळे पाहतायत ते खरं आहे ना हेच कळेना ..अगदी मोडलेला ट्रक ,कसलही लाईट ची सोय नसलेला ,नंबर प्लेट नाही ,काचा फुटलेल्या आणि ड्रायव्हिंग च्या सिट जवळून पुढे जाताना वर पाहिलं तर ड्रायव्हिंग सिट रिकामी .............आणि आणि तेवढ्यात समोर खोल  दरी अगदी एक क्षणात गाडी ने जोरात वळण घेतलं आणि रस्त्याला लागली .....वाचलो ...पुन्हा दीर्घ श्वास ...मागे वळून ट्रक पहायचं धाडस नाही झाल पण तरीही हिम्मत करून पहिलं मागे फक्त अंधार होता जणू काही चंद्राने पण आमची साथ सोडलेली ..निशब्द होवून आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं ..की आपण जे अनुभवलं ते खरचं खर होत की भास काही कळत नव्हत ..नुसते प्रश्न थैमान घालत होते मनात . आमच्या मागे काही गाड्या होत्या घाटाच्या सुरुवातीला अचानक कुठे गेल्या ?...नाही हे असं काही नसतं मग माझे डोळे मला धोका देत असतील का ? ..मग या सगळ्यांनी पण तेच पाहिलं जे मला दिसलं ...!!
         ..पुढे दूरवर एक ढाबा दिसला .. अंग थरथर त होते ...मोठं धाडस करून चहा घेवू म्हटलं .आणि गाडी ढाबयाजवळ थांबली .आणि  चहा घेण्यासाठी एका कोपऱ्यात ली जागा बघून मुलांना मांडीवर घेवून बसलो .गावातली सात आठ लोक बोलत असलेली चर्चा  कानावर पडली,,,"कालच्या ट्रक अक्सिडेंट मधला माणूस नाही वाचला पण ट्रक तरी वाचायला पाहिजे होता " पुन्हा आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो ......
 ( स्वाती प्रशांत गुरव )

2 comments:

  1. Shwaas tr ashya thikaani srwachech 1 minute thaambatat pan ......tumhi hyaa prasangalaa shaabd rup agdi perfect dilaat......ek minit maaja hi shwaas roklaat ������

    ReplyDelete

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...