Friday 21 December 2018

          वास्तव मनाला भिडलेल 
 भरलेले चार कॅन घेवून सायकल निघाली होती .खर तर ती सायकल छोट्या मुलाला घेवुन निघालेली अस म्हणू .कारण  एक छोटासा जीव ,त्याच्या वाजनापेक्षा च हे ओ झ घेवून सायकल हातात पकडुन ताकद लावून ढकलत घराकडे निघालेला ...मी त्याला पाठमोरा पहिला .अगदी पहिली दुसरीला मुलगा असावा असा विचार करत होते ,याला आज शाळा नसेल का किती अवघड काम सागितले आहे याला आई वडिलांनी ,,हा विचार करत होते तोच माझी गाडी त्याच्या बाजूने पुढे निघाली आणि पाहिले तर हा छोटा शंतनु .. आमच्याकडे कामासाठी ज्या ताई येतात त्यांचा मुलगा .गाडी थांबवली आणि त्या ला विचारलं मदत करू का बाळा .चल कॅन  घरी ठेवून येवू आपण ..आणि का रे शाळेत का गेला नाही .
तो म्हणाला ,"अग दीदी ,शाळेतून च आलोय आता जेवणाची सुट्टी झाली तोवर घरी जाऊन पाणी भरून होईल म्हणून आलो ,हे कॅन घरात ठेवून परत जातो शाळेत ."
      दुसरी तला मुलगा केवढा हा समजूतदार पणा. तिथेच विचार करत होते आणि हा मुलगा घरी जाऊन कॅन ठेवून पुन्हा शाळेला निघालेला ."दीदी अजून इथेच होय गेली नाहीस काय ", तेव्हा मी विचार चक्रातून बाहेर आले .आणि त्याला म्ह ट लं चल काहीतरी खाऊ घेवून देते .जेवण केलं का तू ,त्याने हो म्ह  ट ल आणि तरीही माझ मन राहवलं नाही आणि त्याला मी बेकरी तून थोडा खाऊ घेवून दिला .त्याने पण तो लगेच घेतला कारण खरंच त्याला भूक लागलेली .
            घरी पोहोचले कामवाल्या ताई ना म्ह ट ल ,शंतनु भेटलेला पाणी भरत होता .तेव्हा ती माऊली म्ह ट ली ,"अग पोरगं ऐकतच नाही .काम करू नको म्ह ट ल तरी .मी घरी जस्तोवर घर आवरून भात केलेला अस तोय .परवा शाळेत बोलवून घेतलेलं , म्हणलं यान आणि काय केलं काय ठाव ,तर बाई म्हणल्या पोरगं हुशार आहे स्कॉलरशिप ,च्या तासाला लाव .म्या हो म्हणाल आणि घरी आले, तर पोरगं म्हणताय काय तास ने लावायचा मला, माझा मी अभ्यास करतुया .तू लय डोक्याला ताप करून घेवू नग. मग म्याच म्हणलं करुदे काय करायचं ती चार पैस पोटाला कमवल म्हणजे बास .सावलीत बसून करायचं काम मिळालं म्हणजे बसं ".
          हे त्या माऊलीचे बोलणं ऐकून मी पुन्हा विचारात गुंग झाले .आपण आपल्या मुलांना डॉक्टर इंजनीयर होण्याची स्वप्न दाखवतो .त्यांच्याकडून अपेक्षा करतो ,त्यांनी ती अपेक्षा पूर्ण करावी म्हणून त्यांचं सगळं ऐकतो हट्ट पुरवतो .पण पूर्ण होतात आपली स्वप्न .?.अचानक आवाज आला, मम्मी . ..माझा पाहिलीत इयत्तेत शिकत असलेला मुलगा टीव्ही बघत होता तहान लागलीय पाणी आणून दे म्हणून आवाज देत होता .... एका बाजूला दुपारच्या जेवणाच्या सुट्टीतला वेळ वाया जाऊ न देता  आणि  स्वतच्या आई ल त्रास होवू नये म्हणून दुसरी शिकत असलेला मुलगा दूरवरून पाणी भरतोय.किती खोल दरी आहे या दोन्ही मुलांच्या जगण्यात ... आणि जी आई कोणतीच अपेक्षा न करता पोटपुरत कमावलं म्हणजे झाल अशी म्हणणारी . ..  कसं सगळं जमवतात लोक .जे आहे त्यात सुखी .आणि अश्या परिस्थितीत सुधा न काही सांगता शिकवता कुठून  अवढं शहाणपण येत या कोवळ्या जीवांना .आज CBSE ,ICSE,HSC  board आणि क्लासेस च्या गप्पा मारणारे आपण ,हल्ली संस्कारांचे पण क्लासेस निघालेत तेही लावू कदाचित .परंतु परिस्थिती शी झगडून येणारी हुशारी ,या आपल्या मुलांना कधी कळणार देव जाणे !!!! ( स्वाती प्रशांत गुरव ) 

3 comments:

  1. Gribi khup kaahi shikvte mansala.....te shikshan,smjutdarpanaa kontyaa school mdhye nahi shikvlaa Jaat.������������

    ReplyDelete

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...