Monday 7 January 2019


जीवनाची परीक्षा 
ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श्वास ठेवलाय.
       एक छोटंसं कुटुंब पाच जणाच .परिस्थिती बेताची पण सगळे जिद्दीने जगणारे .दोन मुली आणि एक मुलगा छोटासा संसारचा गाडा आई वडील कष्टानं ओढत  होते  .तिन्ही मुल एकमेकांच्या हाताला पकडून शाळेला जाणारी ,एकमेकांची काळजी घेणारी , वडीला ना कमी पगार त्यात घरभाड आणि शिक्षण होण कठीणच होत.मुलंही  अतिशय कष्ट करणारी ,मुलगा आई ने तयार केलेले मेस चे डबे वेळेत देवून मग शाळेला जायचा ,दोन बहिणी आई ल पापड लाटायला मदत करायच्या ते विकून त्यातून शाळेचा खर्च भगवायचा .शाळेला इतर मुलांसारख दप्तर नाही म्हणून दोन्ही हातांनी घट्ट छातीशी कवटाळले ली वह्या पुस्तकांची  पिशवी लपवून न्याय ची ..वह्या म्हणाल तर मोठ्या दोऱ्याने शिवलेल्या .शाळेत जायचं तर शाळेचा युनिफॉर्म नीट नेटका लागायचा तिथेही जुना युनिफॉर्म कळेल म्हणून कुठेतरी एका बाजूला थांबायचं .पण   कष्टाला परिस्थितीला लाचार होणारी ही मुल कुठली  ,एकदा एका पाहुण्यांनी खाऊसाठी पैसे दिले या तिघा भावंडांनी ice cream खायची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं ,स्टँडवर जिथे रोज येताजाता मुलांना आईस क्रीम खाताना बघायचे तिथे या दोन बहिणी आईस क्रीम आणायला गेल्या पण पण त्या हातातल्या पैशात एकच आईस क्रीम येतंय हे कळल्यावर ते एक  आईस क्रीम घरी घेवून भावाला देवून स्वतच्या खूप दिवसाच्या आईस क्रीम खायच्या ईच्छे ल बाजूला सारून ..."आम्ही दोघींनी खाल्ल तुझंच  आहे हे  ,"  असे म्हणणाऱ्या बहिणी या व्यवहारी जगत सापडणं कठीण आहे ..घरात असेल ते वाटून घेवून खाणारी भावंड  ,कारण आईचे संस्कार च तसे होते ,कुणापुढे कधी हात पसरायचे नाहीत ..पण अभ्यासात कुणीच कमी नव्हत.तिघांचीही स्वतःची पुढे काहीतरी बनण्याची स्वप्न होती.
    अश्यातच मोठी मुलगी बघता बघता १८ वर्षाची झाली आणि तीच लग्न साध्या पद्धतीने नात्यातच लावून देण्यात आल ,परिस्थिती ची जान मनात ठेवून तिनेही लग्नाला होकार देवून,नवीन  आयुष्याला सुरुवात केली  ..हलू हलू दुसऱ्या  मुलीलाही  ही लग्नासाठी मागणी येवू लागली आणि एका चांगल्या घरात तीच लग्न ठरलं ..आणि जमेल तस खर्च करून तिचं ही लग्न लावून देण्यात आल..दोन्ही मुलींनी स्वतःची पुढे काहीतरी होण्याची स्वप्न बाजूला ठेवली.पण या दोघींचा भाऊ ..यान मात्र मनाशी निश्चय केलेला परिस्थिती शी युद्ध करण्याचा आणि ते युद्ध जिंकण्याचा ..ध्यास !!
       आता या कथेचा मुख्य सूत्रधार या दोन मुलीचा  भाऊ ..लहानपणापासून च वेगळं व्यक्तिमत्त ..! बालपण मनदूर  गावच्या मातीत गुरांच्या मागे काट्या कुत्यातून वाट काढत गेलेलं .शाळेला जायचं तर एक तास च चालणं असायचं .त्यातच लहानपणी मंडळाच्या गणपती ची आरास करताना ..लोखंडी शिडी च्या वरच्या पायरीवरून थेट खालच्या पायरीवर जोरात शॉक लागून पूर्णपणे बेशुद्ध होवून , १५ दिवस जीवन मरणाची झुंज देणाऱ्या त्या घटना .याची  साक्ष  म्हणजे चेहऱ्यावरील  हनुवटी वरील आजही दिसणारी  ती मोठी खूण ......
   हे व्यक्तिमत्त्व १२ वी ची परीक्षा पास झा, इजिनियर व्हायची याची खूप मनापासून इच्छा होती .पण  परिस्थिती आड आली आणि इंजिनअर होण्याचं स्वप्न B.C.A  la प्रवेश घेवून पूर्ण काऱ्यच त्यानं ठरवलं .झोकून देवून अभ्यास केला .आणि कुशग्र बुद्धिमत्ता मुळे शिक्षकाच्या आवडता विद्यार्थी बनला .ते ही शिक्षण चांगल्या मार्क नी पूर्ण केलं ..आणि एका खाजगी कंपनी मध्ये जॉब मिळाला .बाकीची मुल पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली .डिग्री हातात येवुन ही १० वी पात्रता असलेल्या स्तरावरील जॉब करत असल्याचे त्याच्या एका शिक्षकांनी पाहिले तेव्हा ते शिक्षक म्हणाले ,"तू एवढा हुशार मुलगा आणि हे काम का करतोय .पुढे शिक ,सगळी मुलं पुढील शिक्षणाला पुण्यात गेलीत त्यांची मदत घे .मी सांगतो त्या मुलांना ".
       दुसऱ्या दिवशी २ दिवसाची कामावरून सुट्टी घेवून हा पुण्याला गेला .जेवणासाठी पैसाची पुरती सोय नव्हती तर राहण्याचा प्रश्नच नव्हता .पण मित्रांची साथ लाभली आणि कशीतरी राहायची सोय झाली,काही कॉलेज मधे चौकशी केली पण कॉलेज चालू होण्यासाठी आणि अडमिशन साठी २ दिवसाची मुदत आणि त्यात  फी च आकडा ऐकून ,परत आहे त्या ठिकाणी आहे त्या जागी तेच काम पुन्हा सुरू झाल पण मनात विचारांचं थैमान चालू होत ..पुढं शिकायचंय .  .. नातेवाईकां कडे थोडी पैशाची व्यवस्था झाली ...कुणापुढे हात पसरायचे नाहीत हा संकल्प सोडण्याशिवय पर्याय नव्हता ..आणि बँकेत शिक्षणासाठी कर्ज मिळत अस ऐकलेल म्हणून थेट बँकेच्या maaneger कडे जाऊन सत्य परिस्थिती सांगितली .तिथेही नकार मिळाला ..उठून परत फिरणार अवढ्यात manager साहेबांनी मार्क लिस्ट दाखव असा आवाज दिला आणि पुन्हा बसा अशी आज्ञार आली ..थोडा काहीतरी आशेचा किरण दिसला ..आणि साहेबांचे शब्द काळजात घुसले ..," मी माझ्या मुलासाठी १ लाख रुपये बाजूला ठेवलेले पण त्याला तुझ्यावढे मार्क नाही मिळाले त्यामुळे या १ लाख ला काही किंमत नाही पण जर हे तुझ्या उपयोगाला आले तर तू हे इंजिनिअर झाल्या वर मला परत कर ....आयुष्याला कलाटणी देणारा हा क्षण !!!!
             पैसे भरले आणि कॉलेज जीवनात प्रवेश मिळाला .पोस्ट graduation नावाचं लेबल साठी  अवढा आटा पिटा .....साधी राहणी मुळे पुण्यातल्या शहरी कॉलेज च्या जगात ही आपलं स्वतचं व्यक्तिमत्व उठा वदार पने दिसणार..राहण्याचा ,जेवणाचा , शिक्षण आणि कर्जच ओाझ कमी करण्यासाठी याने नेट कॅफे मधे जॉब शोधला .कॉलेज सुटलं की कॅफे मधे पडेल ते काम करणं रात्री कॅफे बंद करणं ,सकाळी लवकर जाऊन कॅफे च मालक सांगेल ते ऐकान आणि परत दिवसभर कॉलेज ..अस सगळ जवळ जवळ २ वर्ष चाललं ..खूप ओढाताण ..जेवणाची आबाळ पण जिद्दी पुढं नियती ल ही झुकाव लागत म्हणतात ना तास झाल अगदी ..  कॅफे मालकाच्या घरी एकदा कार्यक्रम होता त्यासाठीची सर्व कामे मालकाने याला सा गीतलेली.याच्या प्रामाणिक पानावर आणि कामावर पूर्ण विश्वास ..आणि तोही सर्व चोखपणे पार पाडायचा ..रात्री उशिरा कॅफे मालकाच्या घराचा कार्यक्रम संपला आणि हा ही रूम वर जायला निघाला तेव्हा त्या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना जाताना या मुलाला सोडा अस मालकाने सांगितलं ..हा गाडी मधे मागच्या सिट वर बसला आणि दोन तरुण पुढे बसलेले त्याच्या मधे सॉफ्टवेअर मधल्या काही गोष्टींची चर्चा चालू होती आणि त्यातली बरीच उत्तर या आपल्या हुशार मुलाने दिली ..आणि तीच ती पहिली संधी ...जी त्याची आयुष्य बदलणारी ठरली .......,...... पोस्ट ग्रॅज्युएशन होत असतानाच कमी पगाराची पण नवीन शिकायला मिळणारी ..आणि इंजिनायर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच ती संधी ...
       संधी आणि '  ती ' दोनी अकाच वेळी मिळाल्या .. ती म्हणजे  नातातलीच एक अशी की जिला याच्या सर्व कष्टाची  जाणीव होती , आता याच्याकडे काही नाही पण याच कर्तृत्व पुढे खूप मोठं असणार आहे हा विश्वास असणारी ती भेटली .आणि आयुष्याची साथीदार झाली ..आणि आज ७ जानेवारी २०१९ , सर्व स्वप्न पूर्ण होवून ,यांची दोन मुल त्यांच्या आजीआजोबा सोबत आनंदात वाढतायत ...दोन बहिणींनी ही स्वतच्या सासरतल्या जबाबदाऱ्या पार पाडून एक सरकारी खात्यात नर्स तर दुसरी एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे ..
           आज स्वतःच्या जिद्दीने ,कष्टाने ,त्यागाने आज हाच मुलगा एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनी मध्ये manager पदावर काम करत आहे .आई वडील, बहिणी ,दोन मुल ,आणि बायको यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून ही त्या जुन्या उपकारांची रोज आठवण काढतोय ..आणि जो जो तरुण गावाकडून स्वप्न उराशी बाळगून पुण्यात येतोय त्यांना होईल ती मदत करायचा प्रयत्न करतोय .... या कथेतील अशक्य ते शक्य करून दाखवणाऱ्या या सूत्रधारा च्या आयुष्याची जोडीदार होण्याचे भाग्य मला लाभले ..त्यातून हे मांडण्याचा प्रयत्न ...
       आताच्या जगात मोठं झाल्यावर मागची परिस्थिती क्षणात विसरून जातात लोक ..पण हा मुलगा त्याला मिळालेल्या प्रतेक मदतीला आजही मदत करतोय .आजही त्या शिक्षकांच्या ,नेट कॅफे चालवणाऱ्या काका नच्या ,बँकेतील मनेजर च्या चरणी नतमस्तक होतोय ज्यांनी मोठी सप्न दाखविली आणि ती पूर्ण करण्याची जिद्द दिली ..आणि त्या जिद्दीला पूर्ण होईपर्यंत साथ दिली ..  (स्वाती प्रशांत गुरव )

आयुष्याचं गणित सरावाने जमत ,
पण कसं जमेल विचार करत बसलं तर अधुरच राहत .
आयुष्याच्या अभ्यासक्रमात दुसरा विषय नाही ,जमलं तर ठीक नाहीतर काट्या कुट्या न शिवाय पर्याय नाही .
काटे टोच तील म्हणून घाबरु नका ,रस्ता सरळच आहे .
पण मार्ग बदलू नका .  

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...