Tuesday 4 December 2018

अपेक्षांचं ओझ ...

    अपेक्षा हा शब्द एकटा असला तरी त्याच्यामध्ये खूप ताकद आहे .आणि मग त्याच्या मागे ओझ  हा शब्द लागला की मग झालाच ..अपेक्षांचं ओझं ...म्हणजेच थोडंसं निगेटिव्ह ,न पेलणार असं.
      अपेक्षा कुणी ,कधी ,कुणावर ,कुणाकडून, करायच्या याला बंधन नाही .लाहांनानी मोठ्यनाकडून खेळण्यांची  अपेक्षा .आणि मोठ्यांनी लहनंकडून अभ्यासाची ...काहीतरी चांगलं करण्याची  अपेक्षा,फक्त अपेक्षा आणि अपेक्षा .जग सगळं या अपेक्षांच्या ओझ्यावर दबून गेलंय .
        विद्यार्थी दशेतील काळ खर तर अतिशय छान मनासारखं जगण्याचा ..हवे ते निवडून त्याचा अभ्यास करण्याचा पण हा अपेक्षा शब्द मधे येतो ...आणि या विद्यार्थी दशेला वेगळं वळण मिळत .... मला माझ्या आई ने  सांगितलेआहे ...की  डॉक्टर हो ..किंवा वडिलांनी सांगितलं आहे इंजिनिअर हो .आणि त्यानुसार काही मुले अभ्यासाला लागतात ...पण मनात स्वतच्या आवडत्या विषयाची वेगळीच ओढ असते.गाण्याची आवड, नृत्याची आवड , चित्रकलेची आवड किवां भाषा विषय घेवून पुढे काहीतरी करायची इच्छा असेल तर ती बाजूला ठेवून मुले आई वडील जे सांगतात त्या दिशेला वळतात .पण त्यामुळे मागे राहतात ..आणि मनात नसताना , आवड नसताना केवळ दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात आपण कोणतच करिअर नीट सांभाळू शकत नाही .
हे मुलांना खूप उशिरा कळून चुकत पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते ,जे आहे ते स्वीकारून आयुष्यभर जगावं लागत .
         आयुष्य म्हणजे म्हतलं तर तारेवरची कसरत आणि म्हतल तर मनमुराद जगण्याची संधी ..गरिबाला पोटाला मिळण्याची चिंता ,मध्यमवर्गीयांना मोठी स्वप्न पाहण्याची भीती ,आणि श्रीमंतांना घरातून बाहेर पडण्याची चिंता .. म्हणजे खर पाहिलं तर सुखी कुणाला म्हणावं .जो जे मिळाले आहे त्यात सुख मनेल तोच सुखी .मग आताच्या करीयर ची स्वप्न पाहणाऱ्या .. करिअर ल दिशा देवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी उघड्या डोळ्यांनी जगाची स्थिती पाहा , आजूबाजूची  बदलती  परिस्थिती पहा आणि मग निर्णय घ्या डॉक्टर व्हायचं , इंजिनिअर व्यायच ,व्यावसायिक व्हायचं ..का जे आवडेल त्यात पुढे जाऊन त्यात जे मिळेल त्यात समधान मानून एक स्वस्थ ,निरोगी ,प्रामाणिक आयुष्य जगायचं .आहे त्या परिस्थितीत सकारात्मक विचार करून जीवनात यश मिळवा .जीवन जगत असताना ,यश मिळवत असताना ,अपयश दुखः अडचणी या जीवनात येणारच पण त्यावर  विचार करून ,चिंतन करून मार्ग काढणे गरजेचे आहे .
  ( स्वाती प्रशांत गुरव ) 

5 comments:

  1. स्वाती मॅडम खूपच छान . असेच चालू ठेवा काही दिवसानंतर स्वाती मॅडम एक प्रमुख वक्त्या म्हणून भाषण द्यायला सुरु करतील तो दिवस जवळ आला आहे .

    ReplyDelete
  2. खूपच छान लिहिले आहे अगदी माफक शब्दात.... कमीतकमी शब्दात खूप मोठी गोष्ट सांगितली आहे... :)

    ReplyDelete
  3. खूप छान ! थोडक्यात आणि प्रभावी लिखाण आहे, असेच सुरु ठेवा

    ReplyDelete

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...