Sunday 28 October 2018

           


 माझा गाव
   खरं तर हे लिखाण करायला तसा उशीरच झालाय ..अस एक ठिकाण की जे जगाच्या नकाशात आपलं नाव उमटवू पाहतंय ..ते ठिकाण म्हणजे  माझे गाव ....सुंदर  निसर्ग , धरण , अभयारण्या ने वेढलेले माझे गाव .
     मागे काही दिवसांपूर्वी गावी जाणं झालं .नवरात्री चे दिवस होते .आमच्याकडे नऊ दिवसांचा उपवास करणाऱ्या महिला देवीच्या मंदिरात नऊ दिवस राहतात .मंदिरात आम्ही प्रवेश केला आणि सर्व उपवास करणाऱ्या महिलांकडे पाहिलं तर त्याच्या विविध विषयांवर गप्पा चाललेल्या होत्या ..पण ऊपवसाचा थकवा कुठे जनवला नाही .
        गावात शांतता होती .गावातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून त्यामुळे बऱ्यापैकी आर्ध गाव तरी शेतात होत .नाचणी ,आन भाताचे पीक घेतलं जात .तसा आमचा भाग म्हणजे कोकणची सुरुवात ..लाल माती ,हिरवीगार झाडी ,मुबलक पाणी अस निसर्गाची सर्व वरदान लाभलेलं माझ गाव .
गावातील तरुण मंडळी मुंबई ला नोकरी निमित्त गेलेली.आणि बाकीचे तरुण आमच्या चांदोली अभयारण्यात आणि धरण क्षेत्रात कामाला ..जे मिळालेले आहे त्यात सुख आणि समाधान मानणार माझ गाव .
 गावाच्या डोंगर भागात ताड आणि माडाची झाड .शेजारी शेवताई देवीच मंदिर झाडांनी अच्छा दलेल .जणू देवीवर सर्व झाडा झुदुपानी सावली धरलेली .डोंगरावर पवनचक्की ची पाती घर घर आवाज करत होती .
        चांदोली अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प हे आमच्या गावच प्रमुख वैशिष्ट . चांदोली अभयारण्य जेव्हा आतून पाहायला मिळालं तेव्हा कोणत्यातरी वेगळ्या जगात आल्याचा भास होत होता ...प्राण्याचं जग ..त्यांच्या माहितीचे बोर्ड ..आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणवठा ..खूप शांततेचं ठिकाण फक्त पक्षांच्या किलबिलाटा चा आवाज ..तिथे प्राण्यांच्या निरिक्षणासाठी केलेली एक छोटी खोली होती त्यातून पणावाठयवर येणाऱ्या  प्राण्यांची गणना  करण्यासाठी मदत होते .
  जंगलच्या मध्यभागात एक उंच माची होती ..त्यावर जेव्हा चढून उभी राहिले ..तेव्हाचा नजरा काही वेगळाच ..अका बाजूला झाडीने अच्चदालेला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दिसणारे धरणाचे पाणी .एक अप्रतिम निसर्ग दृष्य ! खरच अभिमान आहे मला हे गाव माझ सासर म्हणून लाभलं .जीवाला जीव लावणारी माणसं गेलो की काही ना काही तरी जवळ जे असेल ते खुशीने देणारी ..माझी माणसं माझा गाव .. म्हणजे मनदुर तालुका शिराळा ,जिल्हा सांगली ( स्वाती प्रशांत गुरव )










No comments:

Post a Comment

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...