Friday 26 October 2018


स्त्री कालची आजची आणि उद्याची -
       डिलिव्हरी रूम मधून बाळाच्या रडण्याचा  आवाज आला , की बाहेरचे कान टवकारून बसलेले नातेवाईक उठून दरवाजा जवळ येतात आणि लगेच आतून आवाज येतो मुलगी झाली .हा आवाज ऐकला की त्या मुलीच्या बापाचं काळीज मोठं होत ,तर काहींचे नाराजीचे सूर उमटतात .आणि एकीकडे आणखी एक स्त्री, जीवनाच्या या संघर्षात उतरण्यास तयार झालेली असते.संघर्ष हा शब्द स्त्री चे आयुष्य व्यापून टाकतो .जन्मापासून ते अगदी अखेरच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त संघर्ष .संघर्ष स्वतःचा स्वतःशीच , बदलत्या विचाराशी ,बदलत्या समजाशी ,पर्यायाने जगाशी .आणि या त तिला धाडस देण्याचं काम करतात ते दोन जीव एक आई आणि दुसरा वडील .तिच्या वाट्याला आयुष्यात जे सुखाचे क्षण येतात त्याचा फार मोठा वाटा हा फक्त आणि फक्त आई वडिलांचा असतो .या दोन महान निर्मात्यांना शतशः प्रणाम .....
      जन्मानंतर जेव्हा लहानग्या मुलीला घरी आणतात तेव्हा दोन्ही प्रकारचे प्रतिक्रिया व्यक्त होत असतात .पुढे ही मुलगी जेव्हा मोठी होत असते तेव्हा भावाबरोबर खेळताना कायम स्वतः हारून भावाला जिंकवाव लागत .शाळेला गेली आणि परत यायला उशीर झाला की तिच्यावर प्रश्नांचा बधिमार व्यायला सुरुवात होते . तिथपासून तिच्या खऱ्या आयुष्याला आणि डोक्यात निर्माण होणाऱ्या वादळाला सुरुवात होते .की आपल्यालाच का विचारलं जातं मुलांना का नाही , आपल्यालाच का बंधन मुलांना का नाही .आताची बाहेरची परिस्थिती बघता मुलींना अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत बॉडीगार्ड ची गरज आहे असाच म्हणावं लागेल ..आणि खरंच आहे ते .
      असं नक्की काय झालंय की , मुलींना इतकं घाबरून रहाव लागतंय ,बाहेर पडताना जीव मुठीत धरून जावं लगतय ,कोण जबाबदार आहे याला ? राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले यांच्या काळात एवढ्या गंभीर समस्या नावत्या  स्त्रियांना मग हे आताच का ? का आपल्याला एकटी रात्री त भयाण अंधारात कधी जावे वाटले तर जाता येत नाही आणि चुकून उशीर झालाच तर घरी परतू का नाही जगू का मरू अशी  अवस्था होते मुलं निर्भिडपणे रात्री अपरात्री कुठेही फिरू शकतात पार्ट्या करू शकतात ..कारण ती मुलं आहेत .
           मुलगा आणि मुलगी हा भेदभाव कागदोपत्री नष्ट झालाय .पण वास्तविक पाहता स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत त्यावरून ...एक स्त्री म्हणून तिच्याकडे फक्त फक्त वाईट नजरेनेच,स्वार्थी नजरेनेच  पहिले जाते .जोपर्यंत समाजाची ही नजर बदलत नाही तोवर स्त्री पुरुष समानता झाली ...अस म्हणत येणार नाही.
    आज जेव्हा मुलीला तिच्या पायवर उभ केल जात आणि लग्न करून सासरी पाठवलं जात तेव्हा तिच्याकडून सगळच परफेक्ट यावं ही अपेक्षा असते .तेवढ्यात पुन्हा आई होन आल ..आपसूकच त्यातून जबाबदाऱ्या वाढतात .आई सून मुलगी बायको म्हणून  कुठे कमी  पडायची संधी नसते ..जमलच पाहिजे.आजच्या जास्त पगार कमावणाऱ्या मुली स्वतःला हवं तसं राहतात जगतात मग त्यांचं काय चुकलं .स्वतःला हवे ते ,पण अंगभर कपडे घातले तर लोकांना काय त्रास होतो . स्त्री च आयुष्य बदलणं हे स्त्री च्याच हातात आहे .. सैरभैर उधलायच की , आपलाच लगाम आपल्या हातात घट्ट पकडून चालायचं . आणि हे जमलं नाही तर , होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला समोर जायचं .आतापर्यंत स्त्री वरील अत्याचाराच्या घटना कुठेतरी दूरवर परराज्यात घडलेल्या ऐकायला यायच्या टीव्ही वर ऐकायला मिळायचे पण परत त्या आपल्या नेहमीच्या वृत्तपत्रात येवू लागल्या .हलू हलू अगदी आपल्या आसपास घटना घडली अस ऐकायला मिळू लागलाय .आपल्याला जर पुरुषांच्या बरोबरीत काम करायचे असेल ,मग ते क्षेत्र कोणतेही असो ,तर आपल्याला स्वतः मनाने आणि शरीराने खंबीर होण गरजेचं आहे . तरच आपलं घर ,समाज ,राज्य ,देश आपण या होणाऱ्या वाईट बदलांपासून वाचवू ..जर स्त्री स्वतः  बदलली तर  प्रत्येक स्त्री च्या  जन्म आणि मृत्यू या दोन्ही महत्वाच्या गोष्टींना समाज देश राष्ट्र सलाम करेल .
      

3 comments:

  1. मनाला स्पर्श करतील असे विचार आहेत. खुपच सुंदर

    ReplyDelete

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...